मेन
लोगो : जागतिक दृष्टी दिनविशेष
स्क्रीन टाइम, बदलती जीवनशैलीने दृष्टी धूसर
‘ब्लू लाईट’ बिघडवतोय झोपेचे चक्र; वेळेवर तपासणी, आरोग्य जपण्याचे आवाहन
सकाळ वक्ष्सेवा
नाशिक, ता. ७ : डिजिटल युगात संगणक, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे डोळ्यांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. यातून धूसर दिसणे, डोळे जळजळणे किंवा डोके दुखणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून रात्री झोप येत नाही म्हणून रात्रभर मोबाईल बघत बसणे हे आजच्या काळातले व्यसन बनले आहे. त्यासाठी जागतिक दृष्टी दिनाच्या अनुषंगाने डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टीचे महत्त्व यावर जागृती करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही किंवा टॅब्लेट स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर प्रचंड ताण येतो, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोम’ किंवा ‘डिजिटल आय स्ट्रेन’ म्हणतात. जन्मलेल्या बाळाचा फोटो काढणे अर्थात बाळाची पहिली ओळख ही स्मार्ट फोनशी होते. त्यानंतर मूल जेवत नाही म्हणून मोबाईलवर व्हिडिओ दाखविणे, मूल शांत रहावे म्हणून आई वडील स्वत:च मुलांच्या हातात मोबाईल थाेपवतात तर, वापरकर्त्याला सतत गुंतवून ठेवण्याचे काम समाजमाध्यमे, रिल्स, ऑनलाइन शापिंग, गेम्स अगदी चोख करीत असतात. त्याचा परिणाम वाढत्या कोवळ्या वयातच लहान मुलांना चष्मा लागतो. अनेकदा बालवयात दृष्टी धूसर होणे किंवा वृद्धापकाळात वय झाले म्हणून दृष्टीच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु योग्य वेळी केलेली तपासणी, चष्म्याचा वापर आणि आधुनिक वैद्यकीय उपचार यामुळे दृष्टी वाचविणे सहज शक्य आहे.
----चौकट
नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात की,
-एका मिनिटात १५ ते २० वेळा पापण्या लवतात पण, स्क्रीनकडे बघताना त्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे डोळ्यांतील ओलावा कमी होऊन डोळे कोरडे पडतात.
-सतत एकाच अंतरावर पाहिल्यामुळे डोळ्यांचे स्नायू थकतात आणि दृष्टी काही काळ धूसर जाणवू लागते.
-डोळ्यांवर सतत ताण पडल्यामुळे डोकेदुखी, डोळे जळजळणे आणि डोळ्यांभोवती थकवा (डार्क सर्कल) जाणवतो.
-स्क्रीनमधून निघणारा ‘ब्लू लाईट’ शरीरातील ‘मेलाटोनिन’ या झोपेच्या संप्रेरकाला कमी करतो, ज्यामुळे झोपेचे चक्र बिघडते.
----चौकट
काय काळजी घ्यावी
-रात्रीच्या अंधारात किंवा कमी प्रकाशात मोबाईल वापरल्याने डोळ्यांच्या बाहुल्यांवर अतिताण पडतो.
तासन्तास एका ठिकाणी बसून राहिल्याने शरीराच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो, त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो.
-स्क्रीन वापरताना ‘ॲन्टी-ग्लेअर’ किंवा ‘ब्लू लाईट फिल्टर’ चष्मा वापरल्याने डोळ्यांना थेट किरणांपासून संरक्षण मिळते.
-काम करताना खोलीत पुरेसा प्रकाश असावा. स्क्रीनचा ब्राइटनेस खोलीतील प्रकाशाच्या पातळीनुसार ठेवावा.
------