Agricultural News : शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी ‘ॲग्रीबिड ट्रॅकर’ प्रणाली

शेतीमालाला खुली बाजारपेठ मिळावी, योग्य बाजारभाव मिळावा व शेतकऱ्यांची फसवणूक टळण्यासाठी विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे.
Agricultural News
Agricultural Newssakal
Updated on

नाशिक- शेतीमालाला खुली बाजारपेठ मिळावी, योग्य बाजारभाव मिळावा व शेतकऱ्यांची फसवणूक टळण्यासाठी विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे. मविप्र संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमधील पदविकाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी ॲग्रीबिड ट्रॅकर ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या लिलावामध्ये सहभागी होता येईल. स्वतंत्रपणे बोली लावता येईल. ही प्रणाली शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com