सकाळ गरबा फेस्ट

सकाळ गरबा फेस्ट
Published on: 
लोगो श्री निखिल यांच्याकडून घेणे ‘सकाळ गरबा फेस्ट २०२६’ची रंगत वाढणार! -------------------------------------- उद्यापासून विशेष गरबा वर्कशॉप; १८ व १९ ला ‘गरबा विथ रॉक बँड’ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : नवरात्रोत्सवाचा उत्साह यंदा दुप्पट करण्यासाठी ‘सकाळ मीडिया ग्रुप’तर्फे १८ आणि १९ ऑक्टोबरला ‘सकाळ गरबा फेस्ट २०२६ - ‘गरबा विथ रॉक बँड’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान तिडके कॉलनी, राणे नगर आणि मखमलाबाद रोड येथे होणाऱ्या गरबा वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन गरब्याच्या स्टेप्स शिकण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. फेस्टच्या पार्श्वभूमीवर गरबा रसिकांसाठी नाशिक शहरातील तीन प्रमुख ठिकाणी विशेष गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी ‘सकाळ गरबा फेस्ट’मध्ये नाशिककरांना गरबा आणि लाइव्ह रॉक बँडचा भन्नाट अनुभव घेता येणार आहे. गरबा वर्कशॉपसाठी प्रसिद्ध नृत्य विशारद डी फोर अकादमीचे संजय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणाऱ्यांना गरब्याच्या विविध स्टेप्स आणि ताल शिकविण्यात येणार आहेत. गरबा खेळण्याची इच्छा असूनही योग्य स्टेप्स किंवा तालाची माहिती नसलेल्या नागरिकांसाठी हे वर्कशॉप विशेष आकर्षण ठरणार आहे. बेसिक गरबा स्टेप्स, पारंपरिक गरबा पॅटर्न, ग्रुप फॉर्मेशन, ताल-संगीताशी जुळवून घेणे आणि आधुनिक गरबा मूव्हज यांचे प्रशिक्षण सहभागींना देण्यात येणार आहे. नवशिक्यांसह नियमित गरबा खेळणाऱ्या रसिकांनाही या वर्कशॉपमधून आपल्या स्टेप्स अधिक प्रभावी करण्याची संधी मिळणार आहे. वर्कशॉपमुळे सहभागी होणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून, आगामी ‘सकाळ गरबा फेस्ट’मध्ये मनमोकळेपणाने थिरकण्यासाठी त्यांची विशेष तयारी होणार आहे. पारंपरिक गरब्याच्या तालाला आधुनिक संगीताची जोड देत ‘गरबा विथ रॉक बँड’ ही खास संकल्पना साकारण्यात येणार आहे. लाइव्ह रॉक बँडचे दमदार परफॉर्मन्स, गरब्याचे तालबद्ध संगीत, आकर्षक लाईटिंग, रंगीबेरंगी वातावरण आणि नृत्याचा उत्साह यामुळे फेस्टला वेगळीच रंगत येणार आहे. गरबा आणि रॉक म्युझिकचा हा फ्युजन अनुभव नाशिककरांसाठी नवरात्रोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे. गरबा शिकण्याची इच्छा असलेल्या रसिकांना ‘सकाळ’ने ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत शहरातील तीन ठिकाणी आयोजित गरबा वर्कशॉपमध्ये सहभागी होता येणार आहे. सहभाग आणि अधिक माहितीसाठी शरद धात्रक (मो. ९८९०० १११२०) आणि चंद्रमा पाटील (मो. ८३८०० ३३७४२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इन्फो... गरबा वर्कशॉपची तारीख आणि स्थळ गरबा वर्कशॉप : ७ ते १० ऑक्टोबर मखमलाबाद रोड : दुपारी ३ ते ४ तिडके कॉलनी : संध्याकाळी ५ ते ६ राणे नगर- संध्याकाळी ७ ते ८ इन्फो... मुख्य गरबा फेस्ट : १८ व १९ ऑक्टोबर वेळ : संध्याकाळी ६ ते १० पर्यंत ठिकाण : लोटस लँड लॉन अँड बँक्वेट, गंगापूर रोड, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com