सांगवीत श्रमदानातून वनराई बंधारा

सांगवीत श्रमदानातून वनराई बंधारा
Published on: 
VAK26B01700, सांगवी (ता. शिरपूर) ः अरुणावती नदीपात्रात श्रमदानातून बांधलेला वनराई बंधारा. --- सांगवीत श्रमदानातून वनराई बंधारा पाणी अडविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा वकवाड, ता. १४ : आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सांगवी ग्रामपंचायतीने जलसंधारणाचा पुढाकार घेतला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून अरुणावती नदीपात्रात ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. सोमवारी (ता. ९) राबविण्यात आलेल्या या उपक्रमात लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद व शिरपूर पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये वाळू भरून त्यांचा वापर करत नदीपात्रात वनराई बंधारा बांधण्यात आला. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होणार असून, भूजल पातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. परिसरातील पशुधन व वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहाता लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभारण्याचा सांगवी ग्रामस्थांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या वेळी सरपंच कनिलाल पावरा, उपसरपंच अरुणाबाई कोळी, ग्रामविकास अधिकारी संजय बागूल, निर्मला देशमुख, जिलाबाई पावरा, वेस्तीबाई कोकणी, रेणुकाबाई पावरा, खिमालीबाई पावरा, भारतीबाई भील, भुरीबाई सनेर, जब्बरसिंग पावरा, अंबर भील, धना चारण, जामसिंग पावरा, रघुनाथ कोळ, राजू जाधव, दिलीप कोळी, प्रकाश झोडपे, मच्छींद्र भिल, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.