माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सविता सौंदाणे बिनविरोध येवला तालुका माध्यमिक संस्थेवर कार्यवाहपदी नानासाहेब लहरेची निवड

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सविता सौंदाणे बिनविरोध  येवला तालुका माध्यमिक संस्थेवर कार्यवाहपदी नानासाहेब लहरेची निवड
Published on: 
फोटो-26990, 26991 येवला : तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सविता सौंदाणे, तर कार्यवाहपदी नानासाहेब लहरे यांच्या निवडीनंतर सत्काराप्रसंगी संचालक मंडळ. शिक्षक पतसंस्था अध्यक्षपदी सविता सौंदाणे बिनविरोध सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ४ : येवला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी न्यू इंग्लिश स्कूल तळवाडेच्या मुख्याध्यापिका सविता सौंदाणे, तर कार्यवाहपदी नानासाहेब लहरे यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तनानुसार तत्कालीन अध्यक्ष नानासाहेब लहरे व कार्यवाह सविता सौंदाणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा झाली. सभेत अध्यक्षपदासाठी सविता सौंदाणे तसेच कार्यवाह पदासाठी लहरे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. अर्चना शिंदे यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेत सचिव प्रशांत थोरात यांनी सहकार्य केले. निवडीसाठी शिक्षणप्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील, सहसचिव प्रविणदादा पाटील, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले. उपाध्यक्ष अरविंद जोरी, संचालक वाल्मीक नागरे, कानिफनाथ मढवई, तुकाराम लहरे, शिवाजी साताळकर, संजय डोंगरे, सुकदेव आहेर, विजय आरणे, प्रदीप पाटील, अनिल गावकर, राजेंद्र नागरे, महेश जगदाळे, शैला गवळी आदी उपस्थित होते. सर्व संचालकांसह शिक्षक सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेच्या भरभराटीसाठी कार्यरत राहू, असे अध्यक्षा सविता सौंदाणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com