शहादा शहरातून तृतीयपंथीयाचे अपहरण

शहादा शहरातून तृतीयपंथीयाचे अपहरण
Published on: 
शहादा शहरातून तृतीयपंथीयाचे अपहरण सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. २३ : शहादा (जि. नंदुरबार) शहरातून एका ४७ वर्षीय तृतीयपंथीयाचे अपहरण झाले असून, शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका पांढऱ्या कारमधून आलेल्या दोघांनी अपहरण केल्याचे स्पष्ट झाले आहे. बोरीस (ता. धुळे) येथील नरेंद्र राजेंद्र पाटील (वय २७) यांनी फिर्यादीनुसार, त्यांची मोठी बहीण गौरीगुरु आरती नायक ऊर्फ गौरी राजेंद्र पाटील (वय ४७) गेल्या सात वर्षांपासून शहादा येथील शिवरामनगर भागात वास्तव्यास असून, त्या तृतीयपंथी आहेत. ११ ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादीने बहीण गौरी हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्याने गौरीसोबत राहणाऱ्या तनू आनंदा भिल हिला मोबाइलवरून संपर्क करून गौरीबाबत विचारणा केली असता, तिने गौरी सकाळी अकराच्या सुमारास पांढऱ्या कारमधील दोघांनी तिला नेले असून, एकाने गोल टोपी घातली होती, तर दुसऱ्याने तोंडाला रुमाल बांधला होता. गाडीच्या मागे उर्दूत काहीतरी लिहिले होते, अशी माहिती दिली. लवकरच परत येईल, या आशेने नरेंद्र पाटील व कुटुंबाने दुर्लक्ष केले. मात्र, ती आजपर्यंत परत न आल्याने आणि तिचा मोबाईल सतत बंद येत असल्याने अखेर कुटुंबीयांनी शहादा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. मजबूत शरीर, रंग गोरा, गोल चेहरा, काळे केस, उंची पाच फूट पाच इंच, अंगात जांभळ्या रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाची धोती पॅन्ट, पायात चप्पल, मराठी, हिंदी, अहिराणी आणि आदिवासी भाषा अवगत, असे तिचे वर्णन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com