सिंहस्थ ध्वजारोहणाचे राज्यपालांना निमंत्रण

सिंहस्थ ध्वजारोहणाचे राज्यपालांना निमंत्रण
Published on: 
सिंहस्थ ध्वजारोहणाचे राज्यपालांना निमंत्रण --- मंत्री महाजन यांनी घेतली भेट; तयारीची दिली माहिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : नाशिक-त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वास शनिवारी (ता. ३१) ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याचे शुक्रवारी (ता. २३) राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना निमंत्रण देण्यात आले. या वेळी पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी राज्यपालांना सोहळ्याच्या तयारीसंदर्भातील माहिती दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वासंदर्भात मंत्री महाजन यांनी राज्यपालांना माहिती दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिक, तसेच सांस्कृतिक परंपरेची महत्त्वपूर्ण केंद्रे आहेत. कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्त्वाचा उत्सव आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून देशभरातील संत-महंत, साधू आणि भाविकांच्या श्रद्धेला एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होईल. सिंहस्थाचे भव्यदिव्य आयोजन करताना सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने आयोजनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांची सोय आणि विविध प्रशासकीय व्यवस्थांच्या नियोजनावर भर देण्यात येत असल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीच्या सन २०१५ मधील सुरक्षित व यशस्वी कुंभमेळ्याच्या नियोजनाबद्दलही महाजन यांनी माहिती दिली. या भेटीप्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व लोकभवन कार्यालयाचे प्रबंधक निशिकांत देशपांडे उपस्थित होते. फोटो क्रमांक : एच-33351

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com