सिन्नरला काँग्रेसकडून काळा दिवस साजरा दिल्लीतील नेत्यांवरील लाठीचार्जचा निषेध

सिन्नरला काँग्रेसकडून काळा दिवस साजरा  दिल्लीतील नेत्यांवरील लाठीचार्जचा निषेध
Published on: 
SNR26B23014 सिन्नर ः काँग्रेसतर्फे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी. ------------------ कॉंग्रेस नेत्यावरील हल्ल्याच्या निषेधार्त सिन्नरला काळा दिवस ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.८ ः दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या नेत्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसतर्फे सिन्नरला गुरुवारी (ता.८) लोकशाहीचा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, तालुका काँग्रेस समितीने अध्यक्ष गोरक्ष सांगळे, माजी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरडे, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुजाहिद खतीब, माजी जिल्हा सरचिटणीस सुनील सोनवणे, किसान सेलचे माजी अध्यक्ष चंद्रकांत डावरे, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे माजी कार्याध्यक्ष झाकीर शेख, माजी तालुकाध्यक्ष दिनेश चोथवे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप देशमुख, उपाध्यक्ष मंगेश काकड आदींनी मागणीचे निवेदन दिले. ७ ऑक्टोबर २०२६ ला इंडिया आघाडीचे नेतृत्व करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियंका गांधी संवैधानिक अधिकारांचा वापर करून शांततापूर्ण आंदोलनासाठी जंतर-मंतरकडे जात होते. त्यावेळी त्यांना रोखून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सरकारच्या अमानुष कृत्याचा निषेध करत काळा दिवस पाळत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. याबाबत तहसीलला निवेदन दिले. विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार लोकशाही आणि संविधानावरील गंभीर हल्ला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com