SNR26B23026
सिन्नर ः शहराजवळील कोतवाल मळ्यात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या.
--------------
SNR26B23028
निऱ्हाळे ः वनविभागाने जेरबंद केलेला बिबट्या.
--------------
३६-३
सिन्नरजवळ तिसरा बिबटया जेरबंद
--------------
दहशत मात्र कायम ः निऱ्हाळे येथेही बिबट्या पिंजऱ्यात
-------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.९ ः सिन्नर तालुक्यात एकाच दिवशी शुक्रवारी (ता.९) पहाटे दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले. शहराजवळील कोतवाल मळ्यात चार वर्षाचा नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. शहराजवळ आठवडाभरात पकडलेला हा तिसरा बिबट्या आहे. दरम्यान निऱ्हाळे येथे आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. तालुक्यात शुक्रवारी एकुण दोन बिबटे पिंजऱ्यात अडकवण्यात वनविभागाला यश आले आहे.
-------------
शहराजवळील बारागावपिंप्री मार्गावर असलेल्या कोतवाल मळ्यात बिबट्या पिंजऱ्यात अडकला. आठवडाभरात शहराजवळ पिंजऱ्यात अडकलेला हा तिसरा बिबट्या आहे. महिनाभरापासून बिबट्याचे वास्तव्य होते. कोतवाल वस्ती, उगले मळा बागात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. गत महिन्यात शेळ्यांवर हल्ला करण्यात आला होता.
उगले मळा, उकाडे मळ्यात आणखी बिबट्यांचा वावर असल्याने शहराजवळील उपनगरात, वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांची दहशत अजूनही संपलेली नाही. उगले महिन्यात गत महिन्यात शेळ्यांवर हल्ला करण्यात आला होता. तेव्हापासून बिबट्यांचा वावर दिसून येत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराजवळील कोतवाल खोरा येथील मोहन शंकर कोतवाल यांच्या कोतवाल खोऱ्यात गट क्रमांक १२७ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. त्यात चार वर्ष वयाचा नर बिबट्या अडकला आहे.
निऱ्हाळे येथे गणपत बाबूराव सांगळे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शक्रवारी (ता.९) पहाटे बिबट्या अडकला. बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करणेही अवघड झाले होते. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर सांगळे यांच्या शेतात असलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वनविभागाचे सैय्यद यांच्यासह रोहित पगारे, निखिल वैद्य आदींच्या पथकाने दोन्ही बिबट्यांना मोहदरी येथील वनोद्यानात हलविले आहे.
-----------