तेरापंथ महिला मंडळातर्फे उपक्रम

तेरापंथ महिला मंडळातर्फे उपक्रम
Published on: 
NSK26H33446 जळगाव : तेरापंथ महिला मंडळाच्या उपक्रमात सहभागी महिला सदस्य. ........ तेरापंथ मंडळातर्फे महिलांसाठी उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या निर्देशानुसार जळगाव तेरापंथ महिला मंडळातर्फे ‘माझी शक्ती, माझी ओळख’ आणि युवती विभागातर्फे ‘डिस्कव्हर युवर शक्ती’ कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रामातून महिलांमधील आत्मविश्वास, कौशल्य आणि सुप्त गुणांना वाव देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी अध्यक्षा विनीता समदरिया यांनी ‘श्री उत्सव प्रदर्शनात’ग्राम श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी परीक्षक म्हणून अग्रवाल समाजाच्या अध्यक्षा पूजा अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र प्रभारी निर्मला छाजेड यांचीही उपस्थिती होती. या उपक्रमात घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये कन्या मंडळाच्या रांगोळी स्पर्धेत रिद्धी उमेश चौरडिया यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ‘माझी शक्ती, माझी ओळख’मध्ये मयूरी कोठारी प्रथम, सुनीता दुगड द्वितीय, तर मीना छाजेड तृतीय आल्या. ‘डिस्कव्हर युवर शक्ती’मध्ये प्रज्ञा दुगड प्रथम, कोमल राहुल छाजेड द्वितीय आणि विजयश्री लालवानी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. रौनक चौरडिया व मयूरी कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. दक्षता सांखला यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
Marathi News Esakal
www.esakal.com