‘आरोग्यशाला’मध्ये
१८पासून जनजागृती
नाशिक : गणेशवाडी येथील आयुर्वेद सेवा संघ संचलित आरोग्यशाला रुग्णालयाच्या कायचिकित्सा विभागातर्फे जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त सोमवार (ता.१८) पासून गुरुवारपर्यंत (ता. २१) विशेष आरोग्य अभियान आयोजित करण्यात आले आहे. हे अभियान दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ओपीडी नं. १४ येथे होणार आहे. हे अभियान वैद्य विनय सोनंबेकर (प्राचार्य), वैद्य पंकज दीक्षित (अधीक्षक), डॉ. एकनाथ कुलकर्णी, डॉ. हरीश गर्गे, डॉ. कुमुदिनी सावळे, डॉ. संजीवनी राठोड, डॉ. अमोघ जोशी व डॉ. नीलेश कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.