धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 28641
दोंडाईचा : हस्ती शाळेत राखी व थाळी सजावट स्पर्धेत विद्यार्थ्यांसह सहभागी पालक.
--
राख्यासह कलाकुसरीच्या थाळी
सजावटीतून संस्कृतीचे दर्शन
--
हस्ती शाळेत राखी व थाळी सजावट स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : दोंडाईचा येथील हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पूर्व प्राथमिक विभागातर्फे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त नुकतीच एका विशेष राखी बनविणे आणि थाळी सजावट स्पर्धा झाली. संस्थेचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनात झालेल्या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकांनी आपल्या चिमुकल्या पाल्यांसोबत या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत आपल्या सुप्त कलागुणांचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार घडविला.
-
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पालकांनी व विद्यार्थ्यांनी केवळ आकर्षकच नव्हे तर पूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. याशिवाय उपलब्ध टाकाऊ व नाविन्यपूर्ण साहित्याचा कल्पकतेने वापर करत देखणी थाळी सजावट साकारण्यात आली. या उपक्रमातून आपली भारतीय पारंपरिक संस्कृती, आधुनिक सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांना केवळ रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व समजत नाही तर त्यांच्या मनात प्रेम, बंधुभाव, नातेसंबंधांची जपणूक, सर्जनशीलता आणि निसर्गाविषयीची काळजी निर्माण होते, हे स्पष्ट करण्यात आले. स्पर्धा झाल्यानंतर उत्कृष्ट कलाकृती सादर करणाऱ्या विजेत्या पालकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच, या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वच बालकलाकार विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देत त्यांच्या कौशल्याचे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापिका पूनम पाटील, स्मिता साठे व माधुरी पाटील यांच्या मार्गदर्शनात हस्ती पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.