NSK26H28538
जळगाव : उमवि कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित संचालक मंडळ.
---
अकरा टक्के लाभांश, विशेष कर्जमर्यादेत वाढ
(उपशीर्षक)
उमवि कर्मचारी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीच्या सभासदांसाठी विशेष कर्जाची मर्यादा वाढविण्याबरोबर या वर्षी सर्व सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचा निर्णय पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच विद्यापीठ अधिसभागृहात झाली. अध्यक्ष अरुण सपकाळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील पतपेढीच्या वार्षिक कामाचा अहवाल व वार्षिक आर्थिकपत्रकास मान्यता दिली. २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. सभासदहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. सभेस पतपेढीचे उपाध्यक्ष संजय ठाकरे, सचिव डॉ. अनिल लोहार, संचालक मंडळातील डॉ. महेंद्र महाजन, राजू सोनवणे, डॉ. सोमनाथ वडनेरे, जयश्री देशमुख, दीपक गावित, विकास बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.
सभासदांसाठी विशेष कर्जाची मर्यादा एक लाख रुपयांनी वाढवून साडेआठ लाख करण्यात आली. दरमहा भरल्या जाणाऱ्या वर्गणी रकमेत स्वेच्छेने वाढ करता येणार आहे. या वर्षी लाभांश ११ टक्के देण्यात येणार आहे. पतपेढीच्या विविध आर्थिक व प्रशासकीय विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सौरपॅनल बसविण्याबाबत, तसेच पतपेढीच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबतही चर्चा करण्यात आली.
चौकट
ज्येष्ठ सदस्यांचा विशेष सन्मान
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्या हस्ते गुणवंत पाल्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पतपेढीचे सलग २५ वर्षे सदस्य राहिलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.