सोनगीरला दोन लाखांहून अधिकचा ऐवज लंपास

सोनगीरला दोन लाखांहून अधिकचा ऐवज लंपास
Published on
सोनगीरला घरफोडी; ऐवज लंपास सोनगीर ः येथील मण्यार गल्लीतील एका घरातून पहाटे साडेपाचच्या सुमारास १४ ग्रॅम सोने आणि १५ हजार रोख, असा सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास झाल्याची घटना गुरुवारी (ता. १४) घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मौलाना अजीम शेख इक्बाल हे मशिदीत अजान आणि धार्मिक शिक्षण देण्याचे काम करतात. गुरुवारी पहाटे घरात पत्नी व मुलगा झोपलेले असताना पाचच्या सुमारास मौलाना गुजर गल्लीतील जामा मशिदीत नमाज अदा करण्यासाठी बाहेरून घराचा दरवाजा लावून गेले. सकाळी अकराला मौलानाच्या लक्षात संबंधित प्रकार आला. चोरट्यांनी दाराची कडी उघडून कपाटातील रक्कम व दागिने घेऊन पसार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत श्वानपथक मागविले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com