पान-३ मुख्य अंक
--------------
NSK26H33408
त्र्यंबकेश्वर ः शहरातील माकडांना जाळी टाकून पकडताना वनविभागाचे कर्मचारी.
--------------
३६-२
त्र्यंबकेश्वरमधील माकडे
पकडण्याची मोहीम सुरू
------------
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता.२३ ः त्र्यंबकेश्वर आणि ब्रम्हगिरीवरून थेट गल्लीबोळांत हिंडणारी माकडे यांचे एक अतूट नाते आहे, मात्र काही काळांसाठी हे अतूट नाते काही काळासाठी खंडीत होणार आहे. सध्या शहर आणि परिसरातील तसेच ब्रम्हगिरीपर्वत आणि गंगाद्वार परिसरातील माकडांना पकडून लांबवर नेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत मात्र शहरवासियांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
------------------
त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या ध्वजारोहणाची पूर्वतयारी सुरू आहे. दुसरीकडे मान्यवरांसाठी हेलिपॅड तयार करण्याचे कामही सुरू आहे. याचबरोबर शहरातील शंभरहून अधिक माकडांना पकडून बाहेर सोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातून आज पंधरा माकडे जाळे टाकून पकडण्यात आली आहेत. दोन तीन दिवसात ही सर्व माकडे पकडून सोडण्याचा प्रयोग वनखात्याच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.
ही माकडे ब्रम्हगिरी व गंगाद्वार येथून आली व शहरात स्थिरावली. त्यानंतर त्यांचे माकड चाळे सुरु झाले. शहरातील विद्युत वाहिनी, फोन वा इतर वाहिन्यांवर लटकत इकडून तिकडे जाणे, पत्र्यांवरून उड्या मारणे, पूजेच्या ठिकाणी वस्तू उचलून नेणे यासह खाद्यपदार्थ लांबविणे असे मर्कट चाळे सदोदित सुरु असतो. कुंभमेळा ध्वजारोहणाच्या सोहळ्यातही त्यांचा उपद्रव सोहळ्यात होऊ नये म्हणून त्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
----------------