महिला जपानुष्ठान सोहळ्यात दीपोत्सव

महिला जपानुष्ठान सोहळ्यात दीपोत्सव
Published on: 
पान-२ अँकर फोटो-14809 ओझर ः येथील जनशांती धाम परिसरात झालेल्या दीपोत्सवात सहभागी महिला. महिला जपानुष्ठान सोहळ्यात दीपोत्सव हजारो दिव्यांनी उजळले जनशांती धाम सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. ७ : येथील जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील जनशांती धाम परिसरात मातोश्री म्हाळसा माता व मातोश्री फुला माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या महिला जपानुष्ठान सोहळ्यात शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व उपस्थितीत हजारो दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला. ओझर येथील जनार्दन स्वामी आश्रम परिसरात महिलांनी दीपोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण देवभूमी जनशांती धाम परिसर हजारो दिव्यांनी उजळून टाकला. महिला जपानुष्ठान सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील प्रत्येक भागात लावण्यात आलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण आश्रम परिसराचे वातावरण मंगलमय झाले होते. दीपोत्सवानिमित्त लक्षवेधी महाआरतीचा सोहळा विशेष आकर्षण ठरला. हजारो महिलांनी हातात प्रज्वलित दीप घेऊन सामूहिक महाआरतीत सहभाग घेतला. एकाच वेळी हजारो दिव्यांच्या प्रकाशात झालेली महाआरती आणि त्यामधून प्रकटणारा प्रकाश आणि बाबाजींचा प्रचंड जयघोष यामुळे जनशांती धाम परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला जपानुष्ठान सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जप, ध्यान, प्रार्थना, धार्मिक अनुष्ठान, अभिषेक, महायज्ञ, हस्तलिखित नामजप तसेच विविध आध्यात्मिक उपक्रमांमध्ये महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. महिला सक्षमीकरणासोबतच आध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्रकल्याणाचा संदेश या सोहळ्यातून देण्यात येत आहे. शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या सोहळ्यातील दीपोत्सवाने ‘एक दीप श्रद्धेचा, एक दीप संस्कारांचा आणि एक दीप राष्ट्रकल्याणाचा’ असा आध्यात्मिक संदेश देत जनशांती धाम परिसर प्रकाशमय झाले. दीपोत्सवाच्या या मनोहारी सोहळ्याने महिला जपानुष्ठानाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com