धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...
--
दोंडाईचात जागतिक
फार्मासिस्ट दिन साजरा
--
आरोग्यसेवेत फार्मासिस्टच्या योगदानाचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : दोंडाईचास्थित एस.व्ही.एस. दादासाहेब रावल फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. फार्मासिस्टच्या आरोग्यसेवेतील योगदानाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी फार्मासिस्टची प्रतिज्ञा घेतली. स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे सेक्रेटरी सी. एन. भाऊसाहेब व सहसचिव डी. एन. जाधव उपस्थित होते. राज्य औषध व्यवसाय परिषदेचे धुळे व नंदुरबार जिल्हा समन्वयक अमित पवार, आशिष अग्रवाल, शिंदखेडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव प्रविण राजपूत उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना औषधांचा सुरक्षित वापर आणि आरोग्य क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन केले.
-
डी.फार्मसी व बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन, रॅली, भाषणे, प्रश्नमंजुषा व रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात रांगोळी स्पर्धेत जयश्री पाटील (प्रथम), भाग्यश्री दुसाने, रुबीना सिकलकर (द्वितीय) आणि भूमिका चौधरी (तृतीय) यांनी यश मिळवले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये दिव्या जाधव (प्रथम), माहेश्वरी गिरासे (द्वितीय) व भुनेश्वरी गिरासे (तृतीय) विजयी ठरल्या. प्रश्नमंजुषेत वैभव महाजन (प्रथम), प्राजक्ता नगराळे (द्वितीय) व कल्याणी पाटील (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. प्राचार्य डॉ. जी. एम. चव्हाण, प्राध्यापक व तृतीय वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संयोजन केले. सरकारसाहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल, उपाध्यक्ष रवींद्रसिंग जमादार, सचिव सी. एन. राजपूत, सचिव (सामान्य प्रशासन) ललितसिंग गिरासे, सहसचिव आर. टी. गिरासे यांचे मार्गदर्शन झाले.