अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Amravati Teacher Constituency Election : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतच बंडखोरी उफाळली आहे. शिंदे सेनेचे किरण सरनाईक मैदानात असताना भाजपच्या शेखर भोयर, सुमित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच संगीता शिंदे या अर्ज भरणार आहे. याशिवाय रवी राणांचा पक्षही रिंगणात आहे. त्यामुळे महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
Amravati Teacher Constituency Election

Amravati Teacher Constituency Election

esakal

Updated on: 

Amravati Teacher Election: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महायुतीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिंदे सेनेच्या वाट्याला आली आहे. शिंदे सेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com