चिखलदऱ्याला जाण्यापूर्वी ही बातमी वाचा! वीकेंडला वनवे नियम लागू; प्रशासनाचा मोठा निर्णय

Chikhaldara Monsoon Tourism 2026 : मागील आठवड्यापासून मेळघाटच्या दऱ्या-खोऱ्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील वातावरण अतिशय अल्हाददायक व मनमोहक झाले आहे.
Chikhaldara Monsoon Tourism 2026

Chikhaldara Monsoon Tourism 2026

esakal

Updated on

रिमझिम पाऊस, वातावरणातील गारवा, दऱ्या-खोऱ्यांमध्ये दाटलेले धुके, हिरवाईने पांघरलेले शालू अन् आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी चिखलरा पर्यटनगरी आता सज्ज झाली आहे. शनिवारी तसेच रविवारी या ठिकाणी चांगलीच गर्दी होण्याचे संकेत आहेत. मागील आठवड्यापासून मेळघाटच्या दऱ्या-खोऱ्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील वातावरण अतिशय अल्हाददायक व मनमोहक झाले आहे. सकाळच्या वेळी धुके दाटून येत असून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला आहे. त्यामुळे हे वातावरण पर्यटकांना भुरळ घालत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com