भरधाव एसटी लोखंडी रेलिंगला धडकून उलटली, ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू

Gadchiroli ST bus Accident: सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर मार्गावर नवेगाव मुरखळा इथं भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.
Gadchiroli ST Bus Accident Kills Three Including Infant

Gadchiroli ST Bus Accident Kills Three Including Infant

Esakal

Updated on

गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. गडचिरोलीहून उमरखेडच्या दिशेनं बस निघाली होती. तेव्हा सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर मार्गावर नवेगाव मुरखळा इथं भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह एकूण तिघांचा मृत्यू झालाय. तर ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com