

Amravati
esakal
अमरावती: अमरावती महापालिका सफाई कामगार संस्थेमध्ये तब्बल ८८ लाख ११ हजार ९९१ रुपयांचा अपहार झाल्याची बाब निदर्शनात आली असून, शहर कोतवाली पोलिसांनी संस्थेच्या विश्वस्तांसह दोन वेळा लेखा परीक्षण करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक व अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.