नागपूर - शहरात सोमवारी झालेल्या राड्यानंतर, शहर आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिसांनी शांतता राखण्यासाठी संवेदनशील भागात रूट मार्च काढून समुदाय नेत्यांशी चर्चा केली आहे.
दंगलीची बातमी पसरताच, शहर पोलिसांकडून परिमंडळ तीन आणि चारमधील पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या मुस्लिम बहुल परिसरामध्ये संचारबंदी लावण्यात आली. दरम्यान पोलिसांकडून दिवसभर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आल्यानंतर परिसरात शांतता नांदावी यासाठी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शिवाजी पुतळा, चिटणीस चौक, भालदारपुरा चौक, अग्रसेन चौक, सेवासदन चौक, गीतांजली टॉकीज चौक, हंसापुरी रोड (बंडू क्लिनिक ते भगवाघर चौक) या मार्गावरून रूट मार्च काढून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबादत ठेवण्याची सूचना केली.
याशिवाय पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी तातडीने कारवाई करीत, सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना (एसडीपीओ) संवेदनशील भागात गस्त वाढवण्याचे आदेश दिले. एसपी डॉ. पोद्दार यांनी मंगळवारी पहाटे ४ वाजेपर्यंत या भागांना वैयक्तिकरित्या भेट दिली आणि सर्व पोलिस ठाण्यांना सकाळी रूट मार्च काढण्याच्या सूचना दिल्या.
तसेच सकाळी, सर्व पोलिस ठाण्यांनी रूट मार्च काढून असामाजिक घटकांना स्पष्ट संदेश दिला. उपविभागीय अधिकारी आणि पोलिस ठाण्याच्या प्रभारींनीही समुदाय नेत्यांशी बोलून शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.