

Retired Justice Abhay Sapre addresses the Nagpur District Road Safety Committee meeting, stressing strict enforcement of helmet and seatbelt rules
esakal
नागपूर : हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर अनिवार्य करावा. त्याशिवाय शासकीय कार्यालये, उद्योग समूह आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश बंदी करावी. यासोबतच ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ यासारख्या धोरणांचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित नागपूर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार, वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.