Nagpur Municipal Corporation intensifies measures to reduce water loss and detect unauthorized water connections.
esakal
नागपूर : शहरातील पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या आणि पाणीचोरीला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या उपाययोजनांमुळे जलहानीत लक्षणीय घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०२२-२३ मध्ये ४४.५७ टक्के असलेली विनामहसुली पाण्याची टक्केवारी (एनआरडब्ल्यू) २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ३१.२० टक्क्यांवर आली आहे. चार वर्षांत १३.३७ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ८,९२० अनधिकृत, दुहेरी आणि मीटर बसविण्यापूर्वी घेतलेल्या नळजोडण्या आढळल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर नुकत्याच झालेल्या सादरीकरणात महापालिकेने ही आकडेवारी मांडली. शहरातील जलसाठ्यांमधील घटती पाणीपातळी आणि भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती देण्यात येत आहे.