Nagpur residents face water shortages after repair work delays disrupt the scheduled water supply.
esakal
नागपूर,: महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यू कंपनीच्या ढिम्म व अनियोजित कारभाराचा फटका पुन्हा एकदा नागपूरकरांना बसला आहे. विविध दुरुस्ती व सुधारणांच्या कामांसाठी ६ ऑक्टोबरपासून घेण्यात आलेल्या शटडाऊनची मुदत संपूनही कामे पूर्ण न झाल्याने गुरुवारी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा ठप्प राहिला.