yavatmal district bank
sakal
यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित आर्थिक अनियमितता आणि नियमबाह्य व्यवहारांच्या तक्रारींची दखल घेत विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी शुक्रवारी (ता. १२) चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी नांदगाव खंडेश्वर येथील सहायक निबंधक सचिन पतंगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.