

Vidarbha
esakal
तुमसर: रक्ताचे पाणी करून शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस कारखान्यात जाऊन तब्बल पाच महिने उलटले, तरी हक्काच्या घामाचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. तयामुळे देव्हाडा येथील साखर कारखान्याच्या धोरणावर शेतकरी कमालीचे संतापले आहेत. याबाबत हिरालाल नागपुरे यांनी कारखाना प्रशासनाला धुरांडे बंद पाडण्यााचा इशारा दिला आहे. त्यामुळे सिहोरा परिसरात आता शेतकरी आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.