Deenanath Mangesh Hospital Case: भाजपच्या आंदोलनावरुन Vijay Wadettiwar यांचा भडका उडाला | Pune News

सरकारच्या चुकीमुळे आज जनतेला आपले प्राण गमवावे लागले.. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बंद करा.. सरकारने याबाबत ताबडतोब गुन्हे दाखल करावेत; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी.. बघा काय म्हणाले??

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गंभीर घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "नालायक लोक हॉस्पिटल चालवण्याच्या लायकीचे नाहीत. फडणवीस सरकारने लोकांची सेवा व्हावी म्हणून एक रुपयात दिलेली करोडो रुपयांची जमीन आज बेजबाबदार लोकांकडे सोपवली आहे, देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रुग्णालयात अशी परिस्थिती निर्माण होणे हे लाजिरवाणे आहे," असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "जमीन द्यायला यांचेच लोक पुढे आणि आंदोलन करायला देखील यांचेच लोक, यामागे सरकारचीच चूक आहे," असा आरोप त्यांनी केला. तसेच "सरकारच्या चुकीमुळे आज जनतेला आपले प्राण गमवावे लागत आहेत. या रुग्णालयाला तात्काळ टाळे लावून जमीन सरकारने ताब्यात घ्यावी," अशी मागणी त्यांनी केली आहे आणि "सरकारने समित्यांचे चौकशीचे ढोंग थांबवून आजच दोषींवर गुन्हे दाखल करावेत," अशी ठाम भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...