सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा पाटील विरुद्ध पाटील संघर्ष चर्चेत आला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांनी आपले दोन्ही पुत्र विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांना संचालक मंडळात बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवले आहे. या निवडीमुळे मोहोळच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः अजिंक्यराणा पाटील यांची ओबीसी प्रवर्गातून झालेली बिनविरोध निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांच्या टीकेचे केंद्र ठरली आहे. उमेश पाटील यांनी या निवडीवरून राजन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा बँकेतील या राजकीय घडामोडींमुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे, पाटील कुटुंबाचा प्रभाव आणि ओबीसी प्रवर्गातील प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या निवडीमुळे राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील या घडामोडींकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.