

Ahmednagar Crime: कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने कर्जदार रियाज अन्वर शेख (रा. इंदिरानगर, शेवगाव) यास ४ महिने सक्तमजुरी आणि ४६ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा न्यायाधीश एच. आर. जाधव यांनी ठोठावली.
रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट अर्बन सोसायटी लिमिटेडकडून रियाज शेख यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी २१ हजार ११० रुपयांचा धनादेश दिला होता. शेख यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही. संस्थेच्या वतीने अभिजित जयवंत आदी यांनी न्यायालयात दावा दाखल केला. संस्थेच्या वतीने धीरज आव्हाड यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. कर्ज घेतल्याचे कागदोपत्री पुरावे आणि साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने रियाज शेख यास दोषी धरले.
धनादेश न वटल्याबद्दल ४ महिने सक्तमजुरी आणि ४६ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना आणखी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ॲड. टी. एस. उदास यांनी रेणुकामाता मल्टीस्टेटच्या वतीने काम पाहिले. (Latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.