Rahul Gandhi on Ambani Family : ''इकडे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे...'', अंबानींच्या 'प्री-वेडिंग'वरुन राहुल गांधींचा निशाणा

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी लोकांना संबोधित करताना अंबानी कुटुंबाच्या प्री-वेडिंग सेरेमनीवरुन टिपण्णी केली.
Rahul Gandhi on Ambani Family
Rahul Gandhi on Ambani Familyesakal

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी लोकांना संबोधित करताना अंबानी कुटुंबाच्या प्री वेडिंग सेरेमनीवरुन टिपण्णी केली.

राहुल गांधी म्हणाले की, अंबानींच्या कुटुंबात लग्न होतंय. तिथे लोक सेल्फी काढत आहेत आणि इथे लोक उपाशी मरत आहेत.

जगभरातले दिग्गज लोक अंबानींच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत. गुजरातच्या जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरु आहे.

Rahul Gandhi on Ambani Family
Pakistan New Prime Minister: पाकिस्तानचे पंतप्रधानपदी पुन्हा शेहबाज शरीफ, 'इतक्या' मतांनी जिंकली निवडणूक

ग्वाल्हेर येथे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, सध्या मी जे बोलतोय ते कुणीही दाखवणार नाही. टीव्हीवर फक्त अंबानी यांच्या मुलाचा शाही विवाह दाखवला जातोय. तिथे लग्नाची धुमधाम सुरु आहे. जगभरातील लोक येत आहेत.. सेल्फी घेतल्या जात आहेत.. आणि तु्म्ही इथे उपाशी मरत आहात.

राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं. राहुल म्हणाले की, भारत जोडो यात्रेनंतर आम्ही भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. या यात्रेमध्ये आम्ही न्याय हा शब्द जोडला आहे. त्याचं कारण देशामध्ये जो द्वेष पसरत चालला आहे त्याचं कारण अन्याय आहे. सध्या देशात ४० वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी वाढल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण केंद्र सरकार असून मोदींनी जीएसटी लावली आणि नोटबंदी केली. त्यामुळे देशातल्या लोकांचे रोजगार गेले आहेत.

Rahul Gandhi on Ambani Family
BJP Candidate List 2024 : भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर 'या' नेत्याची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा; काय आहे कारण?

ग्वाल्हेर येथे राहुल गांधींनी पु्न्हा एकदा जातनिहाय जनगणनेची मागणी केली. ते म्हणाले की, देशात साधारण ५० टक्के ओबीसी, १५ टक्के दलित आणि ८ टक्के आदिवासी वर्गातील लोक आहेत. म्हणजे 73 टक्के लोक. देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांमधील मॅनेजमेंटमध्ये एकही ओबीसी, दलित किंवा आदिवासी तुम्हाला दिसणार नाही. आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केली तर मोदी म्हणतात- देशात केवळ दोन जाती आहेत.. गरीब आणि श्रीमंत. देशातल्या ७३ टक्के लोकांना संधी मिळावी, असं त्यांना वाटतच नाही. असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com