

Shrirampur Tension: Leaders Step In to Promote Social Harmony
sakal
श्रीरामपूर : श्रीरामपूर हे अशा वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे शहर आहे, जिथे जगातील सर्व जयंत्या साजऱ्या होतात. येथील समाजरचना म्हणजे श्रीकृष्णाचा ''काला'' आहे. ज्याप्रमाणे सर्व पदार्थ एकत्र मिसळल्याशिवाय काल्याला चव येत नाही, तसेच सर्व धर्मांच्या योगदानाशिवाय शहराचा सामाजिक सलोखा पूर्ण होऊ शकत नाही. प्रभू श्रीरामांच्या नावाचा लौकिक जपण्यासाठी कोणालाही वजा करून चालणार नाही, तर सर्वांना सोबत घेऊनच शांततेची परंपरा पुढे न्यावी लागेल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.