Akola Deputy District Registrar Caught Taking Bribe
esakal
जळगाव : अकोला येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच घेताना मुद्देमालासह पकडल्यानंतर त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानी करण्यात आलेल्या झडतीत तब्बल दोन कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे महसूल व मुद्रांक विभागात खळबळ उडाली आहे.