आम्हालाही हर्बल गांजा पेरण्याची परवानगी द्या; प्रशासन चक्रावले

निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्ते
निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्तेनिवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्ते
Updated on: 

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : सामाजिक, राजकीय संघटनांसह सामान्य व्यक्तींकडून निवेदनाद्वारे न्यायहक्कासाठी विविध मागण्या शासन व प्रशासनाकडे केली जाते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतात एका एकरावर चक्क हर्बल गांजा पिकविण्याची परवानगी मागितली. एवढेच नव्हे तर त्यासाठी बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, असा आग्रही गुरुवारी (ता. २१) केला. अजब निवेदनानंतर प्रशासन चक्रावले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मधुकर शिंगणे, जुल्फिकार शेख, सतीश मोरे, स्वाभिमानी कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तीव्र आंदोलन गाजविणारे राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते तहसीलदारांच्या दालनात निवेदन घेऊन पोहोचले. यावेळी अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी या मागणीसाठी त्यांनी महसूल कार्यालय गाठले असेल असे वाटले.

निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्ते
...अन् पतीने फोडला हंबरडा; अपघातात गर्भवतीसह बाळाचा अंत

तहसीलदार श्याम धनमने यांनी निवेदन स्वीकारून त्यावर नजर टाकली. निवेदनातील विषय आणि मागणी अनपेक्षितच नव्हे तर चक्रावणारी होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला, कडधान्य उत्पादनाची शेती परवडत नाही. शेतमालाला बाजारात भाव नाही. शासनाचा हमीभाव नसल्याने शेती तोट्यात जात आहे. अशी विविध कारणे सांगून एका एकरावर हर्बल गांजा उत्पादनाची परवानगी देण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर गांजा पिकाचे बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, असा आग्रही धरला.

उपरोधक ओळी बोल्ड अक्षरात

नवाब मलिक यांच्या जावयांच्या शेतात हर्बल गांजाचे पीक सापडल्याची बातमी मागील आठवड्यात राज्यभरात प्रसारमाध्यमातून झडकली होती. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सदर प्रकार हर्बल वनस्पती असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी एका एकरात हरबल गांजा पिकविण्याची परवानगी देण्याची उपरोधक मागणी निवेदनात बोल्ड अक्षरात नमूद केली आहे.

निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्ते
आईच्या मृत्यूला न आलेला मुलगा दशक्रियेला आला अन् गमावला जीव

शरद पवारांना पत्र

लिंबाजी विठोबा डोईफोडे (राहुरी खुर्द, ता. सिंदखेड राजा) यांनी किनगाव राजा पोलिस ठाणे मार्फत खासदार शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. पत्रात मौल्यवान हर्बल वनस्पतीची लागवड करावयाची असून, मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com