Akola: उज्ज्वला लाभार्थी पुन्हा चुलीकडे; दरवाढ आणि टंचाईचा दुहेरी फटका; ग्रामीण भागात सरपण जमा करण्यासाठी नागरिकांची लगबग; सिलिंडर टंचाईवर सरपणाचा पयार्य

Rising LPG Prices Push Ujjwala Beneficiaries Back to Traditional Stoves: उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना गॅस सिलिंडर दरवाढ आणि टंचाईचा फटका. ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या असून अनुदान वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

मूर्तिजापूर: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली होती. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती आणि ग्रामीण भागातील सिलिंडर टंचाईमुळे अनेक लाभार्थी महिलांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील विविध गावांमध्ये दिसून येत आहे. वाढत्या खर्चामुळे आणि वेळेवर सिलिंडर उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com