पत्नीने पतीला लाकडाने बेदम मारहाण करून केले गंभीर जखमी

पैसे खर्ची घातले म्हणून नवरा बायकोचा वाद विकोपाला गेला व रागाच्या भरात पत्नीने पतीला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
crime
crime sakal
Updated on: 

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) - पैसे खर्ची घातले म्हणून नवरा बायकोचा वाद विकोपाला गेला व रागाच्या भरात पत्नीने पतीला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील समता कॉलनी येथे बुधवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. सदर मारहाणीत पतीच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागला असून, त्याला उपचारासाठी जालना येथे हलविले. पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

crime
श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोनी विनय पाल व विनय माशमसिंग पाल दोघे पती-पत्नी समता कॉलनी येथे राहतात बुधवारी सायंकाळी दोघात पैसे खर्च केल्याचे कारणावरून वाद झाला यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला मात्र रागाच्या भरात पत्नीने पतीला लाकडाने डोक्यावर, दोन्ही पायावर व दोन्ही हातावर जबर मारहाण केली.

सदर मारहाणीत दोन्ही हात पायाच्या नळण्या फुटून व डोक्याला जबर मार लागून रक्त निघाले सदर मारहाणीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ॲम्बुलन्स द्वारे गंभीर जखमी विनय यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याबाबत विनय माशमसिंग पाल वय २९ राहणार लालबांद्रा तालुका पटियाला (उत्तर प्रदेश) हल्ली मुक्काम समता कॉलनी देऊळगाव राजा यांच्या फिर्याद व मेडिकल रिपोर्ट वरून पोलिसांनी पत्नी विरुद्ध पतीला मारहाण करून जखमी केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे सदर प्रकरणा चा तपास हेडकॉन्स्टेबल नायबराव मोगल करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com