Mercury Retrograde 2026
esaka
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा परिणाम माणसाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींवर होतो, अशी मान्यता आहे. येत्या २४ ऑक्टोबरला बुध वक्री होणार आहेत. बुध ग्रहाचा संबंध बुद्धिमत्ता, बोलणं, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांशी जोडला जातो. त्यामुळे बुधाच्या या बदलाचा काही राशींच्या नोकरी आणि व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असं ज्योतिषीय गणित सांगतं. काहींना काम पूर्ण करताना अडचणी येऊ शकतात, तर काहींना आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहावं लागू शकतं. ज्योतिषाचार्य पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, या काळात काही राशींनी महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करणं टाळावं. कोणत्या राशींनी कामकाजात अधिक काळजी घ्यायला हवी, ते जाणून घेऊया.