

चोरीचा खोटा आळ घेतल्याचं सहन न झाल्यानं अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चिप्स चोरीचा आरोप केला होता. हा आरोप सहन न झालेल्या मुलानं बुधवारी रात्री किटकनाशक प्राशन केलं. गुरुवारी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पांशकुडा इथल्या गोसाइबाडी परिसरात ही घटना घडलीय. कृष्णेंदू दास असं १३ वर्षीय मुलाचं नाव आहे.