Punjab: चॉकलेट खाल्ल्यानंतर १८ महिन्यांच्या चिमुकलीला रक्ताच्या उलट्या, तपासात धक्कादायक खुलासा

Punjab: मूळची लुधियानाची राहणारी चिमुकलीला तिच्या आई-वडिलांसोबत पटियाला येथे नातेवाईकाच्या घरी गेली होती. विकी गेहलोत या नातेवाईकाने चिमुकलीसाठी स्थानिक किराणा दुकानातून चॉकलेटचा बॉक्स खरेदी केला होता.
girl vomits blood after eating chocolate
girl vomits blood after eating chocolate esakal

Punjab: पंजाबमधील पटियाला येथील एका किराणा दुकानातून खरेदी केलेली कालबाह्य चॉकलेट्स खाल्ल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीला रक्ताच्या उलट्या झाल्या. या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत चॉकलेट्सची मुदत संपल्याचे समोर आले आहे.

मूळची लुधियानाची राहणारी चिमुकलीला तिच्या आई-वडिलांसोबत पटियाला येथे नातेवाईकाच्या घरी गेली होती. विकी गेहलोत या नातेवाईकाने चिमुकलीसाठी स्थानिक किराणा दुकानातून चॉकलेटचा बॉक्स खरेदी केला होता.

चिमुकलीने घरी परतल्यानंतर चॉकलेट खाल्ले त्यानंतर तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. चिमुकलीच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये तीने विषारी द्रव्य खाल्ल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या  कुटुंबीयांनी पोलिस आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने तक्रारदारासह किराणा दुकानात धाव घेऊन नमुने घेतले. या दुकानात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याची पुष्टी आरोग्य विभागाने केली. दुकानातून इतर मुदत संपलेले फराळही जप्त करण्यात आले.

girl vomits blood after eating chocolate
Loksabha election : छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी; दोन मोठ्या नेत्यांसमोर कसा लागणार निभाव?

आरोग्य विभागाचे अधिकारी विकास जिंदाल यांनी सांगितले की, पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही या दुकानात पोहोचलो. सर्व सामानाची तपासणी केली जात आहे. येथे बरेच जुने सामान पडून आहे. या दुकानातील ९० टक्के माल जुना असल्याचे तक्रारदाराने सांगितले.

मिठाईच्या दुकानातून एक्सपायरी डेटच्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. त्याचबरोबर हे दुकान तातडीने सील करावे, असे मुलींच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. (Punjab news update)

यापूर्वी पंजाबच्या पटियालामध्ये गेल्या महिन्यात एका 10 वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू झाला होता. मुलीने वाढदिवसाला कापलेला केक खाल्ल्याने मुलगी आजारी पडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता.

girl vomits blood after eating chocolate
Nitish Kumar : ''एवढे मुलं पैदा केली.. आता सगळ्यांना कामाला लावलं'' नितीश कुमारांची जीभ घसरली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com