Nitish Kumar : ''एवढे मुलं पैदा केली.. आता सगळ्यांना कामाला लावलं'' नितीश कुमारांची जीभ घसरली

Chief Minister Nitish Kumar politics
Chief Minister Nitish Kumar politicsesakal

Bihar CM Nitish Kumar on Lalu Prasad Yadav : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. पुर्णिया येथील बनमंखी येथे बोलताना त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यांनी घराणेशाही, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरुन लालूंना टार्गेट केलं.

भ्रष्टाचारामुळेच लालू प्रसाद यादवांना खुर्ची सोडावी लागली, त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री पदावर बसवलं. आता ते त्यांच्या मुलांना पुढे करत आहेत, असं नितीश म्हणाले.

एनडीए उमेदवाराच्या प्रचारावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी (लालू प्रसाद यादव) अनेक मुलं पैदा केली आहेत. कुणाली इतकी मुलं जन्माला घालण्याची गरज असते का? त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलं पहिल्यापासूनच राजकारणात सक्रीय आहेत. मुळात ते करतात काय तर त्यांच्या वक्तव्यांमधून बातम्या तयार करतात.

Chief Minister Nitish Kumar politics
Loksabha election : छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी; दोन मोठ्या नेत्यांसमोर कसा लागणार निभाव?

दुसरीकडे काँग्रेसने नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते ज्ञान रंजन यांनी दावा केला की, लालूंच्या कुटुंबावर नितीश यांनी केलेली टिपण्णी हे स्पष्ट करते की, नितीश यांच्याकडे दुसरे कुठलेच मुद्दे नाहीत.

Chief Minister Nitish Kumar politics
Nilanga Rain Update: निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीठ, फळपीकांचे मोठं नुकसान; 5 जनावरे दगावली

खरी लढाई लालूंसोबतच- राजीव प्रताप रुडी

माजी केंद्रीय मंत्री आणि सासणचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी म्हटलं की, महाआघाडीच्या उमेदवारांकडे मुखवट्याशिवाय काहीही नाही. खरी लढाई ही लालू प्रसाद यादव यांच्याशी आहे. रुडी यांनी लालूंच्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप केला. ते म्हणाले, लालूंकडे उमेदवारच नाहीत. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com