Ajinkya Shinde on CJP Protest
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे जंतरमंतरवरील आंदोलनाची जबाबदारी आता अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अभिजीत दीपके यांनी एक व्हिडीओ शेअर करून यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, अजिंक्य शिंदे जंतरमंतरवरील आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत.