Bihar firecracker explosion,
esakal
बिहारमधील सिवान जिल्ह्यात फटाके बनवताना भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलमपूर गावात शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा स्फोट झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून मृतांची अंतिम संख्या अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.