

Car Accident News
Esakal
भरधाव कार पुलाला धडकल्यानं तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हरियाणातील कैथल जिल्ह्यात हा अपघात झालाय. अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाई आणि सिसमौर गावादरम्यान कालव्याजवळ ही दुर्घटना घडलीय. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाला धडकली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय.