अटकेनंतर पोलिसांसमोरच आरोपींनी मिश्यांना दिला पीळ, गुन्ह्याचा अभिमान असल्याचा अविर्भाव; चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही, VIDEO VIRAL

Accused Twirl Mustaches Before Police: चेन स्नॅचिंग प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांसमोरच मिश्यांना पीळ दिल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video

Accused Twirl Mustaches Before Police

Esakal

Updated on

Viral Video: पोलिसांनी चेन स्नॅचिंग प्रकरणी अटक केल्यानंतर दोन आरोपींनी पोलिसांसमोरच मिशांना पीळ दिल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर इथं पोलिसांनी दोन चेन स्नॅचिंग करणाऱ्यांना अटक केली होती. एका महिलेकडं पाणी मागण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोनसाखळी खेचली होती. पोलिसांनी चेन कुठं आहे असं विचारलं असता २५ हजारात विकल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com