बर्फात नाही तर 'यमुने'च्या गाळात सुरु आहे छठपूजेचे पवित्र स्नान!

राजधानी दिल्लीतही छठचा सण साजरा केला जात आहे, मात्र येथील छठ घाटातून समोर आलेली छायाचित्रे धक्कादायक आहेत.
बर्फ नाही तर यमुनेचा गाळ आहे
बर्फ नाही तर यमुनेचा गाळ आहेesakal
Updated on
Summary

राजधानी दिल्लीतही छठचा सण साजरा केला जात आहे, मात्र येथील छठ घाटातून समोर आलेली छायाचित्रे धक्कादायक आहेत.

आजपासून छठ या महापर्वाला सुरुवात झाली आहे. दिवाळी सणाच्या 6 दिवसांनी कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छठ हा सण साजरा केला जातो. या 4 दिवस साजरा होणाऱ्या या सणाच्या पहिल्या दिवशी आंघोळ करून खाण्याची परंपरा आहे. राजधानी दिल्लीतही छठचा सण साजरा केला जात आहे, मात्र येथील छठ घाटातून समोर आलेली छायाचित्रे धक्कादायक आहेत.

येथील यमुना नदीत विषारी फेस किंवा गाळ जमा झाला असून यादरम्यान भाविकांनी स्नान केले आहे. कोरोनामुळे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (Delhi Disaster Management Authority) (DDMA) यमुना नदीच्या काठावर छठपूजेला परवानगी दिली नाही.

वृत्तसंस्थेनुसार, कालिंदी कुंज भागातील यमुना नदीत विषारी फेस तरंगत आहे. या फेसाच्या मध्यभागी भाविक स्नान करत आहेत.

शेजारील राज्यांमध्ये होरपळ आणि दिवाळीनंतर वाजवले जाणारे फटाके यामुळे राजधानी दिल्लीतील हवा विषारी झाली आहे. यमुना नदीत अमोनियाची पातळी वाढली आहे. त्यामुळे येथे फेस तयार झाला आहे. अमोनियाची पातळी वाढल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे.

राजकारणही तापले...

यमुनेच्या फेसामध्ये अंघोळ केल्याचे चित्र समोर आल्यानंतर राजकारणही तापले आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्विट केले. त्याचवेळी भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनीही केजरीवाल सरकारला घेरले आणि याच कारणामुळे यमुनेच्या काठावर छठपूजा साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

छठ सणावेळी खाण्यापिण्याची परंपरा

छठ सण चार दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी स्नान, दुसर्‍या दिवशी खरना, तिसर्‍या व चौथ्या दिवशी अनुक्रमे मावळत्या सूर्याला नदी किंवा तलावात उभे राहून अर्घ्य अर्पण करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com