

CJP protest in Delhi
Esakal
दिल्लीत सीजेपीकडून आंदोलन सुरू असून पोलिसांनी सीजेपीच्या नेत्यांची धरपकड केलीय. राजधानीत मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दरम्यान, याचा फटका सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गालाही बसला आहे. शनिवारी झालेल्या आंदोलनाचा मोठा परिणाम झाल्याचा दावा व्यापारी संघटनांनी केलाय. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने म्हटलं की, आंदोलनामुळे एका दिवसात दिल्लीत सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला. ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केलीय. दिवाळीपर्यंत दिल्लीत कोणतेही आंदोलन करू नये अशी मागणी CTI ने CJP आणि इतर राजकीय पक्षांकडे केली आहे.