

Bihar MLC Oath Ceremony
Esakal
बिहारमध्ये विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासाठी आपल्या मंत्र्याला खुर्चीवरून उठवलं. प्रोटोकॉल पाळण्यासाठी मुख्यमंत्री सम्राट चौधरींनी केलेल्या या कृतीची सध्या चर्चा रंगली आहे. कट्टर राजकीय विरोधक असले तरी राजशिष्टाचार पाळत मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा मान राखला.