

A Year After the Ahmedabad Crash, Grief and Fear Continue to Shadow Victims’ Families
sakal
अहमदाबाद: गुजरातेतील अहमदाबादमधील ‘एआय १७१’ विमान अपघाताला आता वर्ष पूर्ण होत आले आहे. या भीषण दुर्घटनेत २६० जणांचा बळी गेला होता, मात्र मृतांच्या नातेवाइकांच्या मनातील दुःख आणि भीती आजही कायम आहे. यातील अनेक कुटुंबीयांना आता विमान प्रवासाची प्रचंड भीती वाटत असून, काही जण या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहेत. अपघातात प्रियजनांना गमावल्यावर कुटुंबीय व प्रत्यक्षदर्शींचे जगणेही अवघड झाले आहे.