Daler Mehandi Viral Video: भर मंचावर दलेर मेहंदींना मंत्र्यांनी फटकारले! व्हिडिओ नंतर मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी; मीका सिंह यांची माफीची मागणी

Daler Mehndi Viral Video: उत्तराखंडमधील कुंजापुरी महोत्सवात गायक दलेर मेहंदी आणि मंत्री सुबोध उनियाल यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मीका सिंह यांनी जाहीर माफीची मागणी केली असून, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संवादातून वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे
Singer Daler Mehndi and Uttarakhand minister Subodh Uniyal’s public disagreement at the Kunjapuri Festival sparks controversy.

Singer Daler Mehndi and Uttarakhand minister Subodh Uniyal’s public disagreement at the Kunjapuri Festival sparks controversy.

esakal

Updated on: 

उत्तराखंडमधील कुंजापुरी महोत्सवात प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांच्यात झालेल्या जाहीर वादानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणावर प्रश्न उपस्थित करत त्यांना मंचावरच सुनावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गायक मीका सिंह यांच्याशी संवाद साधत वाद सामंजस्याने मिटवण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com