Delhi CJP protest
esakal
दिल्लीमध्ये १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये तेजस राजधानी, संपूर्ण क्रांती, मगध एक्स्प्रेस, अमृत भारत एक्स्प्रेससह अनेक महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीला जाण्याचं नियोजन केलेल्या प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासणं गरजेचं आहे.